Maval News : लायन्स क्लब ऑफ वडगांवचा पदग्रहण समारंभ संपन्न; ला.दिलीप मुथा यांची अध्यक्षपदी निवड

रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वैद्यकीय साहित्य देऊन केली सेवाकार्याला सुरुवात

एमपीसीन्यूज – वडगाव मावळ येथे गेली 32 वर्ष सेवाकार्यात सक्रीय असलेल्या लायन्स क्लब ऑफ वडगांवचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला, क्लबच्या नूतन अध्यक्षपदी दिलीप मुथा यांची निवड झाली.

लायन्स क्लबचे प्रांतपाल एमजेएफ राज मुछाल यांच्या हस्ते आणि मावळचे आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर , वडगांवचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी आणि पदग्रहण समारंभ संपन्न झाला.

याप्रसंगी नगरसेवक ॲड विजय जाधव , किरण म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, चंद्रजीत वाघमारे, श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, ज्येष्ठ नेते वसंत भिलारे, रोहन मुथा आदी उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष एमजेएफ सुनीत कदम यांनी गतवर्षीचा अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार अहवाल सादर करून केलेल्या सेवाकार्ये आणि उपक्रमांची माहिती दिली.

एमजेएफ राज मुछाल यांनी शपथविधी नंतर आपल्या मनोगतात लायन्स क्लबची कार्यपद्धती विषद केली त्याचप्रमाणे बालसंगोपन या विषयावर विस्तृतपणे माहिती दिली.

आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी भविष्यात लायन्स क्लबच्या विविध सेवाकार्याबद्दल समाधान व्यक्त करत यापुढे अनेक सामाजिक उपक्रम एकत्रितपणे राबविण्यात येतील असे आश्वासन दिले.

मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे नगरसेवक प्रसाद पिंगळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप मुथा यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लबने दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करत विविध सामाजिक कार्ये यापुढे देखील विविध सेवाकार्ये करणार असल्याचे नमूद केले, सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक , वैद्यकीय, अन्नदान अशी नागरिकांच्या हिताची सेवाकार्ये करण्यावर भर देणार असल्याचे देखील सांगितले.

नविन संचालक मंडळाच्या नियुक्तीनंतर लगेचच सेवाकार्याला सुरुवात करण्यात आली आणि रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वैद्यकीय साहित्य देण्यात आले, इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा काजल गारोळे आणि खजिनदार अर्चना देशमुख यांचेकडे हे वैद्यकीय साहित्य सुपूर्द करण्यांत आले.

ध्वजवंदना वाचन नंदकिशोर गाडे यांनी केले , स्वागत नूतन मुथा यांनी केले, पाहुण्यांची ओळख ॲड.चंद्रकांत रावल आणि कार्यक्रम प्रमुख आदिनाथ ढमाले यांनी करून दिली.

ज्येष्ठ नागरिक चंपालाल मुथा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले या पुरस्काराची माहिती गुलाबराव म्हाळसकर यांनी दिली

तसेच श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाची देखभाल करणाऱ्या श्रीमती कमल मोमीन यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.

लायन्स क्लब ऑफ वडगांवचे संस्थापक अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, डॉ. नेमीचंद बाफना, अमोल मुथा, बाळासाहेब बोरावके , संतोष चेट्टी , प्रदीप बाफना, जितेंद्र रावल, संजय भंडारी, आनंद छाजेड, संजय गांधी, प्रशांत गुजराणी, योगेश भंडारी, आदींनी नियोजन केले

सूत्रसंचालन माधवी बोरावके आणि भूषण मुथा यांनी केले आभार प्रदर्शन आणि सचिव घोषणा झुंबरलाल कर्णावट यांनी केली.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.