Maval News: मावळातील प्रलंबित पाणीयोजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्वरित सुरू करावीत- सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.

मावळ तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांची आमदार शेळके यांनी पुणे येथील कार्यालयात जाऊन  भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता वैशाली आवटे तसेच उपअभियंता पाठक उपस्थित होते.

 

‘मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरज आणि आरोग्याचा विचार करून ग्रामीण भागातील जनतेस पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी यापूर्वीच मंजूर असलेल्या मात्र काही कारणास्तव रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे तात्काळ सुरु करण्यात यावी, असे आमदार शेळके यांनी बैठकीत सांगितले.

 

अनेक योजनांना महाविकासआघाडी सरकारकडून निधी उपलब्ध झालेला असून ती कामे सुरू झाली नाहीत. ती कामे लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी आमदार शेळके यांनी यावेळी केली.

‘प्रलंबित पाणीयोजनांचे काम प्राधान्याने पूर्ण करणार’
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. ज्या योजनांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रलंबित आहे त्या तात्काळ देण्यात येतील. व सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.
सुभाष भुजबळ,  अधीक्षक अभियंता,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.