Maval News: तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी महेश बेंजामिन 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते महेश शैलेंद्र बेंजामिन यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी बेंजामिन यांना मावळचे आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, वडगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, युवा नेते अनिल मालपोटे आदींच्या उपस्थितीत वडगाव मावळ येथे निवडीचे पत्र दिले आहे.

बेंजामिन हे महाराष्ट्र प्रदेश ख्रिश्चन सेवा संघटनेवर संस्थापक म्हणून कार्यरत असून सर्व तळागाळातील अल्पसंख्यांक बांधवांना विविध योजनांचा लाभ व सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळून देण्यात कार्यतत्पर राहिले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणीक व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे बेंजामिन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.