Maval News : ‘जनरल मोटर्स’च्या कामगारांना ‘द ग्रेट वॉल’मध्ये कायम करा -बाळा भेगडे

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना घातले साकडे

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जनरल मोटर्स इंडिया कंपनी चीनच्या द ग्रेट वॉल या कंपनीला विकण्यात आली आहे. त्यामुळे ‘जनरल मोटर्स’चे 1578 कायम व 2000 कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. या सर्व कामगारांना द ग्रेट वॉल कंपनीत कायम करावे, अशी आग्रही मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली आहे.

याप्रश्नी भेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

जनरल मोटर्स इंडिया कंपनी चीनच्या द ग्रेट वॉल या कंपनीला विकण्यात आली आहे. त्यामुळे जनरल मोटोर्सचे 1578 कायम व 2000 कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. नोकऱ्या गेल्यानंतर या कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी राज्यमंत्री भेगडे यांनी पुढाकार घेतला.

जनरल मोटर्स इंडिया कंपनीतील कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता जनरल मोटर्स इंडिया ही कंपनी बंद करण्यापूर्वी सर्व कामगारांना ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्याची मागणी भेगडे यांनी निवेदवनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

या मागणीची तात्काळ दखल घेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून या प्रकरणात व्यक्तिशः लक्ष देण्याची विनंती केली असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.