_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Maval News : पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर वडगाव शहराध्यक्षपदी मंगेश खैरे

0

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त मंगेश पांडुरंग खैरे यांची पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वडगाव शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

त्यांना निवडीचे पत्र संस्थापक/अध्यक्ष गजानन चिंचवडे, मावळ तालुका अध्यक्ष अतुल भेगडे, पुणे जिल्हा सहसचिव रामचंद्र बांगर यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी मावळ तालुका उपाध्यक्ष सोमनाथ त्रिंबके, तळेगाव शहर अध्यक्ष बजरंग रंधवे, ऋषिकेश मुरकुटे, योगेश डंबे,संदिप नवघणे, रविंद्र म्हाळसकर, महेश शिंदे, डहाळे, रामय्या हिरेमठ आदि उपस्थित होते.

खैरे हे मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रभारीपदाची जबाबदारी सांभाळत असून पत्रकारीता पदविका अभ्यासक्रमाची परीक्षा त्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन पदवी प्राप्त केलेली आहे.

त्यांच्या निवडीने तालुक्यात त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment