Maval News: मावळ भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तूंचे वाटप
एमपीसी न्यूज – मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सरचिटणीस सुनील चव्हाण, किरण भिलारे, श्यामराव ढोरे, खंडू भिलारे, प्रसाद पिंगळे, दिलीप म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, शंकर भोंडवे, योगेश म्हाळसकर, नामदेव वारिंगे, नामदेव शेडगे, दीपक भालेराव, सोमनाथ काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन विकास लिंबोरे यांनी केले.याकामी दिव्यांग आधार फाउंडेशनचे गणेश शेटे व महेश शेटे यांचे विशेष सहकार्य लाभले.