Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवार (दि. 22) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने देशाचे नेते, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

उद्या गुरूवार (दि 22) वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहा शेजारी, पंचायत समिती चौकात सकाळी 10 ते 3 या वेळेत शिबीर होईल. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होईल, तसेच प्रत्येक रक्तदात्यास टी शर्ट, मास्क, सॅनिटायझर आमदार सुनील शेळके यांच्या वतीने भेट देण्यात येणार आहे. या शिबिराला तळेगाव दाभाडे येथील गरवारे ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.