.

Maval News : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मावळ तालुक्यात; वाचा मावळात कुठे काय घडलं ?

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात गुरुवारी (दि. 22) मुंबई हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस बरसत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद मावळ तालुक्यात झाली आहे. मावळ तालुक्यात मागील 24 तासात 206.57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मावळ तालुक्यानंतर मुळशी तालुक्यात सरासरी 134.83 मिलिमीटर, वेल्हा 107 मिलिमीटर, भोर 91.50 मिलिमीटर, जुन्नर 59 मिलिमीटर, आंबेगाव 46 मिलिमीटर, खेड तालुक्यात 42 मिलिमीटर पाऊस पडला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात सरासरी 53.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई हवामान विभागाने शुक्रवारी (दि. 23) पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा तर शनिवारी (दि. 24) आणि रविवारी (दि. 25) तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे तसेच अन्य प्रकार घडले आहेत. नेमकं कुठं काय घडलं –

# आपटी गेव्हंडे येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात माती आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील माती बाजुला काढण्याचे काम सुरु आहे.

# मौजे धामणे येथील पुलावरुन पाणी जात असल्याने सदर पुल वाहतुकीसाठी बंद आहे.

# वाडीवळे पुल व नाणे पुलावरुन पाणी जात असल्याने दोन्ही पुल वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

# मळवली स्टेशन जवळील ओशो आश्रमात पाणी गेले होते. परंतू सदर ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करणेत आली आहे.

# कामशेत ते नाणे मधील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली आहे.

# मौजे पिंपरी येथे पुलावरुन पाणी गेलेने पुल व रस्त्याचे नुकसान झाले आहे.

# मौजे चांदखेड येथील पुलावरुन पाणी जात आहे. परंतू पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने वाहतुक बंद झालेली नाही.

# आजीवली भागात पुराच्या पाण्याने भातशेतीचे नुकसान झाले आहे.

# देवले मळवती रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतुक सध्या बंद झाली आहे.

# कोळचाफेसर व मोरवे भागात मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn