Maval News : मावळ तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर यांच्या वतीने सहारा वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज – मावळ तालुका वारकरी भूषण वै.बाबुराव महाराज ठाकर यांच्या सहाव्या वर्षश्राद्धानिमित्त कुसवली येथील निराधारांचा आसरा असणाऱ्या सहारा आश्रमात किराणा धान्य वाटप करण्यात आले.

मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष नरहरी केदारी रोहिदास महाराज धनवे मावळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती अध्यक्ष नारायण ठाकर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्या हस्ते धान्य वाटप झाले.

यावेळी हभप बाबाजी महाराज काटकर यांचे प्रवचन सेवा झाली वै. बाबूराव महाराज ठाकर यांचे वारकरी संप्रदायात फार मोठे योगदान होते. वर्षश्राद्धांचे कार्यक्रमातुन मातापिता सेवाभाव वाढीस मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमास सहारा आश्रम संचालक विजय जगताप, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सूखदेव ठाकर, उद्योजक नारायण मालपोटे, पै. निवृत्ती ठाकर, सरपंच दत्तात्रय पडवळ, शांताराम लष्करी, बाळासाहेब दाते, जि प‌‌‌ गट अध्यक्ष दिगांबर आगिवले, बजरंग तांबोळी, पांडुरंग वारिंगे, मुकुंद खांडभोर, दत्तात्रय मालपोटे, राजु खांडभोर, धोंडीबा मोरे, विकास खांडभोर, धर्मा तिकोणे, गणेश जांभळे, बबन जांभळे, जनार्दन ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, दिगांबर कुडे दत्ता शिंदे, गणेश खांडभोर व ग्रामस्थ आदी मंडळी उपस्थित होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.