_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Maval News : कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक उभारी देणारा प्रा. वाघमारे यांचा ‘मकरंद पॅटर्न’

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधार देऊन त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा कार्यक्रम सध्या आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील विविध कोविड सेंटरमध्ये होत आहे. ज्युनिअर मकरंद अनासपुरे म्हणून ओळख असलेले प्रा. महादेव वाघमारे कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना त्यांच्या खास शैलीत मार्गदर्शन करतात. हास्य, विनोदासोबत मार्गदर्शन करण्याचा प्रा. वाघमारे यांचा ‘मकरंद पॅटर्न’ रुग्णांना मानसिक उभारी देणारा ठरत आहे. अनेक रुग्ण त्यांच्या व्याधी आणि मानसिक तणाव विसरून नव्याने चार्ज होत आहेत.

कोरोनाबाधित एका रूग्णाने प्रा महादेव वाघमारे यांच्या अनोख्या मार्गदर्शन शैलीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, कोविड सेंटरच्या आसपास नातलगही फिरकत नसताना आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर मकरंद अनासपुरे अशी ओळख असणारे प्रा महादेव वाघमारे हे तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था कोविड सेंटर, इंदोरीतील तोलानी कोविड सेंटर, टाकवे खुर्द मधील समुद्रा कोविड सेंटर, लोणावळा नगरपरिषद शाळा कोविड सेंटर व देहूच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोना रुग्णांना ते हुबेहूब मकरंद अनासपुरे शैलीत मराठी चित्रपटातील विनोदी प्रसंग तसेच मानसशास्त्रातील घटना सांगून रुग्णांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

वाघमारे प्रथम खूपच हसवतात हसून हसून डोळ्यातून पाणी येते. हसवत हसवत कोरोनाच्या आजाराविषयीची भीती पळवून लावतात, असा अनुभव सांगताना एक रुग्ण म्हणतो, की, तो कोरोना बाधित असताना ताणतणावात होता. पण वाघामारेंचा हास्यविनोद कार्यक्रम सुरु झाल्यावर काही वेळातच बाधित असल्याचा विसर पडला. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मनी वसे ते स्वप्नी दिसे तसेच सिग्मंड फ्राईड यांचे मानसशास्त्रीय प्रयोग, ग्रामीण कथा सांगून मनोरंजन करतच प्रबोधन केले.

असा हास्य विनोदी कार्यक्रम बंद होऊच नये, असे वाटते. त्यांच्या जवळ आलेल्या रुग्णांना अग बाबावं, याला काय अर्थ हाय, आयोव असे बोलत तुम्हाला काय होतं! असे विचारतात तेव्हा सर्वच रुग्ण आम्हाला काही झाले नाही असे सांगतात. त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी मयुर झोडगे सोबत असतात, ते कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या मनावर काय ताण आला याचे उदाहरण देतात. तेव्हा हा हास्य कलाकार आमचीच परिस्थिती सांगतात.

वाघमारे यांनी दर दहा दिवसांनी हास्य विनोदी कार्यक्रम घेऊन कोरोना रुग्णांच्या मनावरील ताणतणाव कमी करावा. रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याने रुग्ण न विसरता धन्यवाद देतात. माणसाचे शरीर निरोगी असते पण मनाला आजार झाला तर त्याचे परिणाम शरीरावर होतात. तसेच वाद कितीही होवू द्या पण संवाद तोडू नका असे सांगताना अनेक प्रसंग सांगून हसवतात. सतत कोविड सेंटर मध्ये ते संपर्क करतात. त्यांचा मोबाईल नंबर कोरोना रुग्णांना देतात. त्यांना मोबाईल फोन केला तरी अनासपुरे यांना बोलत असल्याचा भास होतो.

कोरोनाच्या महामारीच्या काळात कोरोनाच्या रुग्णांच्या मनावरील ताणतणाव कमी करणारे वाघमारे यांच्या या धाडसी कार्याला कितीही सलाम केले तरी कमीच वाटतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.