Maval News : विविध शासकीय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे आमदार शेळके यांच्या हस्ते वाटप

0

एमपीसी : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना यांसारख्या शासकीय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, बाळासाहेब भानुसघरे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, विद्या मोहिते, उमा शेळके, सुरेखा गाडे, वरिष्ठ लिपिक सूर्यवंशी, दिनेश चव्हाण, दत्तात्रय माळी, गणेश विनोदे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. शासकीय अधिकारी, कर्मचा-यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करावी. तालुक्यातील प्रत्येक गरजूपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचायला हवी. या योजनांचा लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.