Maval News: अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी आमदार शेळके यांनी दिली 10 लाखांची देणगी

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काल (शनिवारी) दहा लाख रुपयांची देणगी दिली. मावळातील प्रत्येक नागरिकानेे या राममंदिर निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शेळके यांनी यावेळी केले.

मावळ तालुक्यातून एक कोटी रुपयांचा निधी या मंदिर उभारणीसाठी गोळा करण्याचा संकल्प सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात आमदार शेळके यांनी देणगीचा धनादेश राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे जिल्हा संयोजक प्रदीप देसाई यांच्याकडे सुपूर्त केला. या कार्याकरीता एवढा वैयक्तिक निधी देणारे शेळके हे राज्यातील पहिले आमदार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

त्यावेळी ‘सियावर रामचंद्र की जय’ असा उस्फूर्त जयजयकार करीत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. सर्वांनी शेळके यांचे अनुकरण करीत सढळ हाताने रामजन्मभूमी मंदिरासाठी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन देसाई यांनी केले.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, विश्व हिंदू परिषद कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, सहसंयोजक निधी अभियान संतोष भेगडे पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा निधीप्रमुख रमेश लोणकर, अध्यक्ष बजरंग दल मावळ गोपीचंदमहाराज कचरे, बजरंग दल संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री अमित भेगडे, महेंद्र असवले, अमोल पगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.