Maval News : आयटीबीपीमध्ये निवड झाल्याबद्दल फाल्गुनी जाधवचा आमदार शेळके यांच्याकडून सत्कार

एमपीसी न्यूज – इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आटीबीपी) दलात निवड झाल्याबद्दल कशाळ गावची कन्या फाल्गुनी सतीश जाधव हिचा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सत्कार केला.

वडगाव मावळ येथे झालेल्या या सत्कार सोहळ्यावेळी अंकुश आंबेकर, तानाजी दाभाडे आदी उपस्थित होते. आमदार शेळके यांनी फाल्गुनीचे कौतुक केले.

मावळ तालुक्यातील कशाळ गावची कन्या फाल्गुनी सतीश जाधव ही आयटीबीपीमध्ये निवड होणारी मावळ मधील पहिली युवती आहे. फाल्गुनीने मिळविलेल्या या यशामुळे मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

फाल्गुनीच्या निवडीमुळे तालुक्यातील युवतींना नक्कीच प्रेरणा मिळेल. सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे ध्येय मनाशी बाळगून फाल्गुनीने कठोर परिश्रम घेतले आहेत. तिच्या यशाचा आलेख उंचावत राहो, अशा शब्दात आमदार शेळके यांनी फाल्गुनीला पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.