Maval News : माळीनगर मधील रस्ता आणि व्यायामशाळेसाठी एक कोटी रुपये देण्याचे आमदार शेळके यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील माळीनगर मधील रस्ता आणि व्यायामशाळेसाठी निधी देण्याची मागणी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक सुनील ढोरे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश म्हाळसकर यांच्या वतीने आमदार सुनील शेळके यांच्याकडे करण्यात आली. आमदार शेळके यांनी या कामासाठी एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

माळीनगर रहिवाशांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गणेश म्हाळसकर व मित्र परिवार यांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष मयुर ढोरे व नगरसेवक सुनील ढोरे यांच्या पुढाकारातून आमदार सुनील आण्णा शेळके यांना माळीनगर मधील मुख्य रस्ता करणे व व्यायामशाळा तयार करणे या कामांबाबत निवेदन दिले.

_MPC_DIR_MPU_II

या कामांना आमदार साहेबांनी तत्काळ मंजुरी देत 1 कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. खूप वर्षांपासूनचा माळीनगर मधील रस्ता व व्यायामशाळेचा विषय मार्गी लावल्याबद्दल आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक सुनिल ढोरे, गणेश म्हाळसकर, जयदिप ढोरे, सचिन वाडेकर, मयुर गुरव, विकी ढोरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.