_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Maval News : कोरोना बाधितांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आमदार शेळके यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हास्य जीवनाचा रस’ ताण – तणाव मुक्ती कार्यक्रमाचे इंदुरी येथील तोलानी कोविड सेंटर येथे मंगळवारी (दि.4) सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ज्युनिअर मकरंद अनासपुरे उर्फ प्रा.महादेव वाघमारे यांनी कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत विनोदाच्या माध्यमातून त्यांना तणावमुक्त केले.

कोरोनाच्या भीतीने रुग्णांच्या मनावर ताणतणाव निर्माण होत असून अनेक रुग्ण घाबरून जातात, म्हणून त्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी मावळातील तळेगाव दाभाडे येथील पणन महामंडळ,समुद्रा इन्स्टिट्यूट टाकवे खु, नगरपरिषद शाळा लोणावळा या सर्वच कोविड सेंटरमध्ये हास्य जीवनाचा रस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असे प्रा. महादेव वाघमारे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमात प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांनी विविध विनोदातून कोरोना रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. त्यांच्या मनावर कोरोनाचा असलेला ताण कमी करून हास्य जीवनाचा रस कसा आहे हे सांगितले. त्यात शरीर निरोगी राहते त्यासाठी मन निरोगी ठेवणे गरजेचे आहे. मनी बसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे आपले जीवन सकारात्मक ठेवण्यासाठी संवाद गरजेचे असल्याचे सांगितले.

हुबेहुब मकरंद अनासपुरे बोलत असल्याचा भास कोरोना रुग्णांना होत असल्याने तल्लीन होऊन सातत्याने हास्याचे फवारे उडत होते. यावेळी कोरोना रुग्णांनी आमच्या जीवनातील गेलेले हास्य परत देण्याचे पवित्र काम हे प्रा. महादेव वाघमारे म्हणजे ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांनी केले. या कार्यक्रमामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याची दिशा मिळाली. आम्हाला हास्याच्या जादूने कोरोना मुक्त झाल्याचे जाणवले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मयुर झोडगे, मेडिकल ऑफिसर डॉ.मनीषा गाव्हंडे, डॉ.चैताली पुयाद, डॉ.तेजस्विनी पानसरे,नर्स लक्ष्मी धोत्रे, वैशाली अंभोरे, रामा वाघमारे, मेघा भरगिरे, महादेव भवर, अविनाश धेंडे व कोरोना रुग्ण उपस्थित होते.

तालुक्यातील वरील चार कोविड केअर सेंटरमध्ये ‘हास्य जीवनाचा रस’ ताण-तणाव मुक्ती कार्यक्रम दर दहा दिवसानंतर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी आर्वजून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.