Maval News : रोटरी क्लबच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाईल – प्रमोद दाभाडे

एमपीसी न्यूज – मावळ मधील अजिवली येथील ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने गणवेश वाटपाचा (Maval News) कार्यक्रम मंगळवारी (दि.24) संपन्न झाला. कार्यक्रमात बोलताना प्रमोद दाभाडे यांनी भविष्यकाळात देखील रोटरी तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमास रोटरी क्लबचे डॉ सूर्यकांत पुणे,विकास उभे,धनंजय मथुरे, प्रमोद अण्णासाहेब दाभाडे व संदीप पानसरे,सोनबा गोपाळे गुरुजी हे उपस्थित होते.

Today’s Horoscope 27 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

रोटरी तर्फे बोलताना प्रमोद दाभाडे म्हणाले की, ग्रामीण भागात रोटरी क्लब गेली अनेक वर्षे आरोग्य, शिक्षण आदी बाबींवर सकारात्मक काम करीत आहे. भविष्यातही विशेषत: शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणी संदर्भात यापुढेही काम करीत राहील अशी ग्वाही दाभाडे यांनी दिली.

गोपाळे गुरुजी यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे करत असलेल्या इतर सामाजिक कामाविषयी माहिती दिली.प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश अरगडे सर यांनी (Maval News) केले.सूत्रसंचालन रोहिणी देशपांडे मॅडम यांनी केले,तर आभार गणेश पाटील यांनी मानले.तसेच कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

रोटरी तर्फे डॉ .सूर्यकांत पुणे,मंगेश गारोळे,अध्यक्ष अनिश होले यांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.