Maval News : मावळ तालुक्यात कोविड केंद्रांची संख्या वाढवा : राजू खांडभोर

तालुक्यात कोविड मदत कक्ष सुरू करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांच्या उपचारासाठी सध्याच्या कोविड सेंटरमधील बेड अपुरे पडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोविड केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी केली आहे.

या संदर्भात खांडभोर यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले आहे. मावळमध्ये जवळपास सर्वच रुग्णालयामध्ये मर्यादेपेक्षा जास्त रुग्ण संख्या झाली. परिणामी उपचारास बेड व्यवस्था अपुरी पडत आहे. तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाची माहिती मिळण्यास नातेवाईकांना अडचण निर्माण होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

रुग्ण व्हेंटेलेटर किंवा ऑक्सिजनवर आहे की सामान्य स्थितीत आहे याबाबतही कोणतीही माहिती मिळत नसल्याची रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. तसेच गोर-गरीब कुटुंबातील रुग्णांना महात्मा फुले ज्योतिबा जन योजने अंतर्गत लाभ मिळण्यास काही हॉस्पिटलमधून जाणून-बुजून अडवणूक करण्यात येत आहे.

मावळ तालुक्यातील रुग्णांना तालुक्यातील रुग्णालयामध्ये उपचारास बेड उपलब्ध होत नाही. मात्र, तालुक्याच्या बाहेरील रुग्णांना बेड कसे काय उपलब्ध होतात, असा सवाल खांडभोर यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर तालुक्यातील रुग्णांलयांना कोरोना रुग्ण उपचाराची दर निश्चिती करून द्यावी. आपण स्वत: या बाबत माहिती घ्यावी. मावळ तालुक्यात कोविड मदत कक्ष लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी खांडभोर यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.