-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval News : ‘कुसगाव बुद्रुक गावात पोलीस पाटलाची नेमणूक व्हावी’

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचे प्रवीण दरेकर यांना साकडे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक गावात पोलीस पाटलाची नेमणूक न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही नेमणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना साकडे घातले आहे.

याबाबत प्रदीप नाईक यांनी दरेकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक या गावचे पोलीस पाटील हे पद सन 2019 पासून रिक्त आहे. सन 2018 मध्ये झालेल्या पोलीस पाटील परीक्षेत जी नियुक्ती झाली होती ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे.

त्यामुळे परीक्षेत दुय्यम म्हणून पात्र असलेले किसन महादू गुंड यांची पोलीस पाटील म्हणून त्वरित नियुक्ती करावी. पोलीस पाटील नसल्याने होत असलेली ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn