Maval News : मावळ तालुक्यातील 40 हजार बालकांना पोलिओचा डोस

एमपीसीन्यूज : संपूर्ण देशभरात आज पल्स पोलिओ मोहिम राबवण्यात आली. त्याचप्रमाणे मावळातही आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा व ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे या ठिकाणी ही मोहीम सुरु करण्यात आली.

लसीकरण मोहिम शुभारंभ प्रसंगी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले, माजी पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ जयश्री ढवळे, वैद्यकीय अधिकारी व कोवीड समन्वयक डॉ.गुणेश बागडे इत्यादी उपस्थित होते.

संपूर्ण मावळ तालुक्यात एकूण 325 बूथ स्थापन करण्यात आले होते. तसेच सोबत 38 मोबाईल टीम देखील कार्यरत होत्या. एकूण 801 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

संपूर्ण तालुक्याचे उद्दिष्ट 40286 बालके (0 ते 5 वयोगट ) इतके होते. यापैकी 40081 इतके उद्दिष्ट म्हणजेच 99.05 टक्के उद्दिष्ट साध्य झाले. शून्य ते पाच वयोगटातील बालकांना आजच्या मोहिमेत पोलिओ डोस देण्यात आला.

पुढील तीन दिवस ग्रामीण भागात व पाच दिवस शहरी भागात ही मोहीम घरोघरी जाऊन राबविण्यात येणार आहे. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ह्या राहिलेले उद्दिष्ट पूर्ण करणार आहेत.

मावळ तालुक्यातील लसीकरण मोहिमेला आरोग्य उपसंचालक संजय देशमुख यांनी देखील भेट देऊन पाहणी केली व विविध सूचना केल्या तसेच जास्तीत जास्त लाभार्थी पूर्ण होतील यासाठी प्रयत्नशील राहावे, याबाबतचे आदेश दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.