Maval News : तिकोणागडावर पावसाळा पूर्व कामांची सुरुवात

एमपीसी न्यूज – गडांवरील वास्तूंचे नुकसाण पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होते. गडावरील ऐतिहासिक वास्तूंना खेटुन पाण्याचा प्रवाह वाहत असल्यास वास्तूची झीज होते. तसेच वास्तुजवळ पाण्याचा साठा झाल्यास बांधकाम कमकुवत होते.

गडावरील वास्तू टिकून रहाव्यात म्हणून गडावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मार्ग मोकळा करून देणे तसेच साठा होऊ नये म्हणुन गडावर पावसाळा पूर्व तयारीत करणे अत्यंत गरजेचे असते.

याचे महत्त्व लक्षात घेत दर वर्षी प्रमाणे गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था, वडगाव मावळ यांच्या वतीने किल्ले तिकोणा गडावरील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह मोकळे करण्यात आले. तसेच बांधकामातील आऊटलेट यांचीही स्वच्छता करण्यात आली. गडावरील वास्तू पासून पाणी दुरवरून जावे म्हणून पाण्याचे मार्गही तयार करण्यात आले ज्याने मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल. या वेळी गडावरील चुण्याच घाण्याची ही स्वच्छता करण्यात आली.

आता पावसाचे पाणी वास्तूपासुन दुरून वाहुन जाईल व वास्तूस त्या पासुन धोका होणार नाही. वास्तुच्या पडझडीस कारणीभुत असणाऱ्या पाण्या मुळे वास्तुची पडझडही होणार नाही.

दोन – तीन पाऊस झाल्यावर पाण्याचे मार्ग पुन्हा मोकळे करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.