Maval News : नगरपंचायतीच्या नूतन इमारतीत पत्रकार कक्ष करावा – वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघ

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतच्या नूतन इमारतीमध्ये पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्षची व्यवस्था करावी अशी मागणी वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आमदार सुनील शेळके व वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना पत्रकार विजय सुराणासह ज्ञानेश्वर वाघमारे, सुदेश गिरमे व गणेश विनोदे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की लोणावळा नगरपरिषदेच्या नूतन इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष व पत्रकार गॅलरीची व्यवस्था असून तळेगाव नगरपरिषदेनेही पर्यायी व्यवस्था केलेल्या व्यापारी संकुलातील जागेमध्येही पत्रकार कक्षाची व्यवस्था केली आहे.

वडगाव शहरातील पत्रकार बांधवांनाही नगरपंचायतमध्ये पत्रकारिता संदर्भातील विविध कामे, पत्रकारपरिषद यासाठी यावे लागते. त्यामुळे नगरपंचायतच्या नूतन इमारतीमध्ये बसण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करावी तसेच सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी बैठक सभागृहात पत्रकार गॅलरीची व्यवस्था करावी,  अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.