Maval News : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 151 मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे सील करण्याची प्रक्रिया

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 151 मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे सील करण्याची प्रक्रिया येथील पै.विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये सोमवारी (दि 11) पार पडली. यावेळी मतदानासाठीच्या 200 मतदान यंत्रांना सील करण्यात आल्याची माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 151 मतदान केंद्रासाठी 151 मशीन तसेच 49 राखीव मशीन यावेळी सील करण्यात आल्या. यासाठी 34 टेबलाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रत्येक टेबलावर 1 निवडणूक अधिकारी, सहाय्यक अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार किवा त्याचा प्रतिनिधी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका दि. 15 जानेवारी रोजी होत आहे. त्यासाठीची सर्व यंत्रणा आज सज्ज करण्यात आली आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती अस्तित्वास आल्यापासून आत्ता पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे. यामुळे प्रथमच ग्रामीण भागातील निकालाचा जल्लोष तळेगावकरांना अनुभवायला मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.