Maval News : तनिष्का पतसंस्थेमार्फत होणारे सामाजिक कार्य अभिमानास्पद – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – समाजातील होतकरु व्यक्तींना आधार देऊन त्यांना उभं करण्याचं काम पतसंस्था करत असतात. हेच काम तनिष्का पतसंस्थेच्या माध्यमातून महिला भगिनी करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

तनिष्का नागरी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी, उद्योजिका सुप्रिया बडवे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे, सचिव सुमित्रा दौंडकर, खजिनदार मनीषा वाघोले आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी ऑनलाइन सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. उद्योजिका सुप्रिया बडवे म्हणाल्या पतसंस्थेच्या माध्यमातून या महिलांनी समाजातील सर्वसामान्य लोकांना रोजगाराची संधी मिळवून देत उत्पन्नाचा स्रोत मिळवून दिला आहे. यामुळे अनेक कुटुंबांना एकप्रकारे आधार देण्याचे काम ही पतसंस्था करत आहे असे मत व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II

अर्चना घारे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कामकाजाची माहिती देऊन ऐन कोरोनाच्या संकटातही केवळ सभासदांचा विश्वास व कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळे संस्था नफ्यातच असल्याचे सांगितले. संस्थेच्या माध्यमातून एका विधवा महिलेने स्वतः गृहप्रकल्प उभारण्याचा व्यवसाय सुरू केला आहे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे म्हटले.

यावेळी संस्थेच्या कर्जदार कमल आगळमे, श्रीकांत शिंदे, बचत प्रतिनिधी संग्राम कारके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वागत मनीषा वाघोले यांनी तर सूत्रसंचालन सुमित्रा दौंडकर व सुवर्णा राऊत यांनी केले, कमल गराडे यांनी आभार मानले.

सूचक व अनुमोदन पुष्पा घोजगे, सारिका विनोदे यांनी केले, अहवालवाचन शबनम खान, वैशाली ढोरे, ललिता कोतुळकर मनीषा आंबेकर, सुवर्णा गाडे, सीमा बालगुडे यांनी केले. ज्योती बधाले, शुभांगी कारके, स्वाती भेगडे, कल्पना काजळे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.