Maval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – अविष्कार फाऊंडेशन इंडिया (कोल्हापूर, महाराष्ट्र ) या नामवंत संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार मावळ तालुक्यातील दोन उपक्रमशील शिक्षिकेंना प्राप्त झाला.

श्रीमती संगिता मनोहर शिरसट या माळवाडी शाळेत कार्यरत आहेत. तर सुमती जाधव (निलवे) या मुळशी तालुक्यात जांबे शाळेत सध्या कार्यरत आहेत.

गेली अठ्ठावीस वर्षे या मावळच्या शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने संपूर्ण मावळ तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.

हा पुरस्कार अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, प्रसिध्द बालकवी शाम कुरळे, प्राध्यापक किसनराव कुराडे, रत्नागिरी डाएटचे अधिव्याख्याते रमेश कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.