Maval News : वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारीपदावर सुवर्णा ओगले यांची फेरनियुक्ती

एमपीसी न्यूज – सुवर्णा ओगले यांची वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज (मंगळवारी, दि. 8) नगरविकास विभागाने दिले.

ओगले यांचा वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार 11 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत ओगले यांची कुठेही नियुक्ती करण्यात आलेली नव्हती.

ओगले यांच्या जागी साधारणपणे एक महिन्याच्या कालावधीत मुख्याधिकारी म्हणून सुचिता पानसरे यांनी पदभार सांभाळला होता.  27 दिवसानंतर ओगले यांची पुन्हा मुख्याधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्वीचे आदेश रद्द करून त्यांची पुन्हा वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असे नगरविकास विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.