Maval News : नामवंत पैलवान गंगाराम कारके यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील उर्से येथील शेतकरी कुटुंबातील नामवंत पैलवान गंगाराम गजानन कारके (वय 87) यांचे आज पहाटे वृध्दापकाळाने (Maval News ) निधन झाले.
मावळ तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,दोन भाऊ, जावई,सुना, नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे.
उद्योजक सुनील कारके व अनिल कारके यांचे ते वडील तर तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांचे बंधू आणि प्रसिद्ध उद्योजक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास (आप्पा) काकडे यांचे ते सासरे होत.
उर्से येथे आज शनिवार (दि. 4) सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर (Maval News )अंत्यसंस्कार होणार आहेत.