Maval News : तालुक्यातील 103 ग्रामपायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींसाठीच्या सरपंच पदाची दि. 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 या कालावधीकरिता ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.29) सकाळी 11:30 वा. वडगाव येथील भेगडे लॉन्स कार्यालयात जाहीर करण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, संतोष सोनवणे, प्रसन्न केदारी, नाना लगड, संदीप माळोदे, उत्तम लोंढे, व मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

पूर्वी 8/12/ 2020 रोजी झालेल्या आरक्षण सोडत मध्ये सर्वसाधारण स्त्री मधून सर्वसाधारण मध्ये मळवंडी पमा, अजिवली व टाकवे बुद्रुक हा बदल झाला. सर्वसाधारण मधून सर्व साधारण स्त्री मध्ये मळवली, कुसगाव बुद्रुक, आंबी, कुसगाव पमा, तिकोणा हा बदल आहे.

सर्वसाधारण स्त्री मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री मध्ये भोयरे, शिलाटणे, गोडुंब्रे हा बदल झाला. सर्वसाधारण मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री घोणशेत हा बदल आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग साते हा बदल आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून सर्वसाधारण मध्ये येलघोल हा बदल आहे. या बदलामुळे काहींमध्ये खुशी तर काहींमध्ये गम दिसत होता. ज्याचे आरक्षण जैसे थे त्यात निरसता दिसत होती.

यावेळी तहसीलदार यांनी पुढील प्रमाणे सरपंच पदाची सोडत जाहीर केली आहे.

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे आरक्षण (एकुण 10 ग्रामपंचायती)
अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण (एकुण 5 ग्रामपंचायती)
1) माळेगाव
2) सावळा
3) वडेश्वर
4) कुणे ना. मा.
5) शिरदे

अनुसूचित जमाती आरक्षण (एकुण 5 ग्रामपंचायती)
1. खांड
2. कुसवली
3. कशाळ
4. इंगळून
5. उदेवाडी

बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती एकुण 93 ग्रामपंचायती
अनुसूचित जाती स्त्री आरक्षण (एकुण 5 ग्रामपंचायती)
1) भाजे
2) कान्हे
3) तुंग
4) सांगिसे
5) दारुंब्रे

अनुसूचित जाती आरक्षण (एकुण 4 ग्रामपंचायती)
1) सांगावडे
2) खडकाळा
3) मोरवे
4) आढले खुर्द

अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण (एकुण 4 ग्रामपंचायती)
1) करुंज
2) नाणे
3) जांभुळ
4) लोहगड

अनुसूचित जमाती आरक्षण (एकुण 4 ग्रामपंचायती)
1) उर्से
2) कुरवंडे
3) सोमाटणे
4) डोंगरगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षण (एकुण 13 ग्रामपंचायती)
1) चांदखेड
2) मुंढावरे
3) आंबेगाव
4) बेबडओहोळ
5) वाकसाई
6) औंढे खुर्द
7) माळवाडी
8) देवले
9) ताजे
10) पुसाणे
11) भोयरे
12) शिलाटणे
13) गोडूंब्रे

नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण (एकुण 12 ग्रामपंचायती)
1) निगडे
2) सुदूंबरे
3) शिवली
4) इंदोरी
5) वराळे
6) नाणोली तर्फे चाकण
7) दिवड
8) कडधे
9) थुगाव
10) शिवणे
11) घोणशेत
12) साते

सर्वसाधारण स्त्री आरक्षण (एकुण 26 ग्रामपंचायती)
1) आपटी
2) केवरे
3) नवलाख उंब्रे
4) परंदवडी
5) करंजगाव
6) उकसान
7) मळवंडी ठुले
8) टाकवे खुर्द
9) आढले बु.
10) आंबळे
11) वेहेरगाव
12) काले
13) ठाकूरसाई
14) साई
15) कांब्रे नामा
16) पाचाणे
17) कोंडीवडे अमा
18) आढे
19) येळसे
20) ओझर्डे
21) कार्ला
22) कुसगाव पमा
23) कुसगाव बु.
24) मळवली
25) तिकोणा
26) आंबी

सर्वसाधारण आरक्षण (एकुण 25 ग्रामपंचायती)
1) वरसोली
2) गोवित्री
3) साळूंब्रे
4) शिळींब
5) कोथुर्णे
6) जांभवडे
7) चिखलसे
8) धामणे
9) कुसगाव खुर्द
10) पाटण
11) कल्हाट
12) महागाव
13) डाहुली
14) गहुंजे
15) सुदवडी
16) ओवळे
17) शिरगाव
18) बऊर
19) डोणे
20) टाकवे बु.
21) मळवंडी पमा
22) अजिवली
23) वारु
24) खांडशी
25) येलघोल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.