Maval News : कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश आर चव्हाण यांची सेवानिवृत्ती

एमपीसी न्यूज – कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश आर चव्हाण यांची सोमवारी (दि.31) सेवानिवृत्ती झाली.

त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सलग 32 वर्ष सेवा केली. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल टाकवे खुर्द येथील समुद्रा कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी (दि.3) त्यांचा कोरोना रुग्णांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

डॉ. रमेश चव्हाण यांनी 15 वर्ष आळंदी ते पंढरपूर वारीच्या भाविकांना वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या कार्यकाळात कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले.

यावेळी डॉ. रमेश चव्हाण म्हणाले प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्ण पाहून कोरोना काळात समुद्रा कोविड केअर सेंटरमध्ये काम करताना समाधान वाटले. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा असुन सेवानिवृत्ती नंतरही गरीब गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा देणार आहे. सेवानिवृत्त झालो असलो तरी कोविड केअर सेंटरमध्ये मोफत सेवा देणार आहेत.

डॉ. चव्हाण यांनी कोरोना काळात रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. मिलिंद सोनवणे, डॉ. सीमा शिंदे, डॉ. प्रियांका खराडे, डॉ. सुहास शिगण, डॉ ब्रिजेश सिंग, प्रा. महादेव वाघमारे, सर्व नर्स, बहुसंख्येने कोरोना रुग्ण उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.