Maval News : ‘पदवीधर व शिक्षक’ निवडणुकीबाबत आमदार संजय जगताप यांनी घेतली आढावा बैठक

एमपीसीन्यूज : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार संजय जगताप यांनी मावळ तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत चर्चा केली.

मावळ तालुक्यातील पदवीधर व शिक्षित मतदारांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनाही निवडणुकीतील मतदानाबाबत सूचना दिल्या.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू , देहूरोड शहर उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा राणी पांडियन, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती वैरागर, देहूरोड शहर सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव, अल्पसंख्यक सेलचे मावळ तालुका अध्यक्ष गफूर शेख व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.