Maval News: मावळला 23 कोटी 65 लाख निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाई

आमदार सुनील शेळके यांचा पाठपुरावा यशस्वी

एमपीसी न्यूज – निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मावळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली आहे. 7 हजार 234 शेतकऱ्यांना 23 कोटी 65 लाख 35 हजार इतकी भरपाई मिळाली आहे.

तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकसानीचा पाहणी दौरा केला होता. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असे सांगितले होते.

प्रातिनिधिक स्वरूपात आज (गुरुवारी) तहसील कार्यालय वडगाव मावळ येथे नुकसानग्रस्तांना धनादेश देण्यात आले.

आमदार शेळके म्हणाले, चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व घरांच्या दुरुस्त्या यासाठी आर्थिक मदत मिळावी. तसेच कोणीही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सतत  पाठपुरावा सुरु होता.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाविकासआघाडी सरकारने नुकसान भरपाई दिली आहे. त्याबद्दल मावळवासियांच्या वतीने त्यांनी आभार मानले.

यावेळी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, सुभाष जाधव, दीपक हुलावळे, सचिन घोटकुले, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, महादु उघडे, नारायण ठाकर, सुदाम कदम, अंकुश आंबेकर, कैलास गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.