Maval News : तुंगी येथे ‘रुडसेट’चे मोफत मधमाशीपालन प्रशिक्षण शिबीर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील रूडसेट संस्थेने मावळ तालुक्यातील दुर्गम भागात तुंगी या गावामध्ये दहा दिवसीय मधमाशीपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. या प्रशिक्षणात विविध सरकारी योजना, प्रोजेक्ट रिपोर्ट, बचत गटाविषयी विविध माहिती, त्यांची कर्ज प्रकरणे व व्यवसाय वाढीसाठीचे प्रयत्न यावर विशेष भर देण्यात आला.

विनामूल्य झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात सहभागींना प्रमाणपत्र आणि गणवेश वाटप करण्यात आले. दहा दिवसांच्या प्रशिक्षणानंतर भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत परीक्षा देखील घेण्यात आली.

प्रशिक्षण कार्यक्रमात विविध मधमाशांचा अभ्यास करण्यात आला. मधमाशांच्या अभ्यासातून त्यांच्यापासून विविध प्रकारचे मध गोळा करून आपला व्यवसाय चालू करू करता येईल, याबाबात प्रशिक्षण देण्यात आले.

यामध्ये तुंगी गावच्या आसपासच्या भागातील जंगलांमधून विविध माशांचा अभ्यास करून त्या कशा प्रकारे मध देतात हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यामध्ये माशा पकडणे, मोहळ काढणे व माशा मध पेटीत सोडणे, त्याचे पालन, संगोपन यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. एका मधपेटी पासून दुसरी मधपेटी कशी तयार करायची याचेही मार्गदर्शन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

मधमाशीपालन प्रशिक्षक विजय महाजन म्हणाले, ‘शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निसर्गातून उपलब्ध केला तर आर्थिक प्रगती साधणे सोपे जाते.’

मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी असून त्याचा योग्य उपयोग करून घेतला तर महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असे मत संस्थेचे प्रशिक्षक हरिश्चंद्र बावचे यांनी व्यक्त केले.

या दहा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये महिलांना मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासामध्ये मोलाचे सहकार्य होणार असल्याचे मत सीमा पाठारे, मनीषा पांचाळ व तेजल वाडेकर यांनी आपल्या अनुभव कथनातून व्यक्त केले.

हे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये संस्थेचे संचालक जयंत घोंगडे, संदीप पाटील, योगिता गरुड, दिनेश नीळकंठ, रवी घोजगे, बाळू अवघडे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like