Maval News : तळेगाव दाभाडे रोटरी क्लबच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी विक्री प्रशिक्षण कार्यशाळा

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समिती, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि मावळ प्रबोधिनी (Maval News ) यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील नोंदणीकृत महिला स्वयंसहायता समूहातील महिलांची व्यवसायिक कौशल्य विकास कार्यशाळा गणेश मंगल कार्यालय कामशेत येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

 

तालुक्याचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन पंचायत समितीच्या माध्यमातून करत असल्याचे सांगितले.

 

आठवडा बाजार तर्फे गणेश चव्हाण यांनी येत्या काळात व्यवसाय वाढिसाठी  महिला बचत गटांनी विक्री कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे. रोटरी क्लब सदस्य यामध्ये बचतगटांना सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

 

IPL 2023 – माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला स्वतःच्या स्वप्नातली निवृत्ती मिळेल का?

 

मावळ प्रबोधिनी अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी  पुढाकार घेऊन आपल्या गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  मावळ प्रबोधिनी कटिबद्ध आहे.यावेळी रिलायन्स रिटेलचे शिशिर सिंग आणि सुनील काळे, शाश्वत कृषी विकास कंपनीचे संचालक विजय ठुबे, आठवडे बाजार संकल्पनेचे निर्माते राजेश माने आदी प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी रोटरी तर्फे मथुरे, भालचंद्र लेले, बाळासाहेब चव्हाण, राजन आम्ब्रे, राजेंद्र गोडबोले, अतुल हम्पे, प्रभाकर निकम, निलेश भोसले उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू भाऊ शिंदे, भाजपा कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे, मावळ तालुका माथाडी कामगार संघटना अध्यक्ष श्री.अशोक भाऊ सातकर, यांच्यासह मावळ तालुका उमेद अभियानांतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी वर्ग व ( Maval News )तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रमुख इंगळे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.