Maval News : दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली; भाजयुमोच्या वतीने विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन शाळेत स्वागत

एमपीसी न्यूज – कोरोना वैश्विक महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर आज (सोमवार, दि. 4) शाळेची घंटा वाजली आहे. त्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वडगाव शहर भाजयुमो वतीने गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फेसमास्क व सॅनिटाइजरचे वाटप करण्यात आले.

दीर्घ सुट्टीनंतर शाळा चालू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि औत्सुक्याचे वातावरण होते. केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक होळकर यांनी कौतुक केले, यावेळी वडगाव शहर भाजप अध्यक्ष अनंता कुडे, स्थानिक शिक्षण समिती सदस्य मनोज ढोरे, नगरसेवक प्रविण चव्हाण, नगरसेवक किरण म्हाळसकर, विनायक भेगडे, रविंद्र म्हाळसकर,शेखर वहीले, कल्पेश भोंडवे, शिवा कटनाइक आदी उपस्थित होते.

यावेळी ज्युनियर मकरंद अनासपुरे प्राध्यापक महादेव वाघमारे यांनी मुलांना कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कोरोनायोद्धा कामाविषयी अनेक हास्यास्पद उदाहरणे देऊन मुलांचे मनोरंजन करून त्यांना प्रोत्साहन दिले, तसेच ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, नगरसेवक प्रविण चव्हाण व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मनोज ढोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रथम दिवशी उपस्थित, राहिल्याबद्दल आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.