Maval News: टाकवे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आंबेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी संचालक  रामचंद्र बाबूराव आंबेकर (वय 90) यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवार) रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर आणि टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन मारूती आंबेकर यांचे ते वडील होत तर प्रसिद्ध बैलगाडा मालक संजय आंबेकर, टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक दिलीप आंबेकर व माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आंबेकर यांचे ते चुलते होत.

त्यांचा अंत्यविधी उद्या (शनिवार, दि. 17) रोजी सकाळी 9:30 वाजता टाकवे बुद्रुक येथे होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III