Maval News : युवासेना मावळ तालुका अधिकारीपदी शाम सुतार, उपतालुका अधिकारीपदी विशाल दांगट

एमपीसी न्यूज – युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी मावळ तालुका युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये युवासेना मावळ तालुका अधिकारीपदी लोणावळा येथील शाम सुतार यांची, तर उपतालुका अधिकारीपदी ( शहर विभाग) देहूरोड येथील विशाल दांगट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

युवासेना मावळ तालुका नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे

शाम उत्तम सुतार (मावळ विधानसभा तालुका अधिकारी), दत्तात्रय केदारी (तालुका समन्वयक), विशाल दांगट -उपतालुका अधिकारी (मावळ शहर), विजय तिकोणे, दिनेश पवळे ( मावळ ग्रामीण), विनायक हुलावळे -तालुका चिटणीस, (मावळ शहर), प्रसाद हुलावळे (मावळ ग्रामीण)

लोणावळा शहर

तानाजी सुर्यवंशी (युवासेना अधिकारी लोणावळा शहर), दत्ता थोरवे (समन्वयक लोणावळा शहर), विवेक भांगरे, ओमकार फाटक, संतोष मेंढरे (उपशहर अधिकारी).

देहूरोड शहर 

संदिप भुंबक शहर युवा अधिकारी (देहुरोड शहर कॅन्टोन्मेंट), गणेश मोरे (देहू शहर)

शाम सुतार म्हणाले, पक्षाने आतापर्यंत दिलेली सर्व जबाबदारी एकनिष्ठने पार पडली आहे. भारतीय विद्यार्थी सेना लोणावळा शहरप्रमुख, युवासेना मावळ तालुका समन्वयक आदी पदांवर काम करीत असताना पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रत्येक जबाबदारी पार पाडली. यापुढेही पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.

विशाल दांगट म्हणाले, शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात सर्वसामान्य आणि गोरगरिबांना मदत करण्याचे काम प्रामाणिकपणे केले. याच कामाच्या जोरावर पक्षाने तालुकापातळीवर काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. युवा सेना आणि शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचविण्याचे काम आगामी काळात केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.