Maval News : डोंगरी आदिवासी भागातील शरद लोहकरे यांची उपनिरीक्षक पदी निवड; ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ आंदर मावळातील डोंगरी आदिवासी भागातील युवक शरद गिरजू लोहकरे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने त्यांचा तळपेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदर मावळ विभागाच्या वतीने, मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघ व तळपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी आदिवासी सेल अध्यक्ष राघोजी तळपे, किसनराव तळपे,नारायण मालपोटे, मारुती खामकर गुरुजी, राजेश राऊत सर, हरिभाऊ शिंगाडे, श्रीरंग चिमटे, भि. श. लोटे, उमाकांत मदगे, लक्ष्मण तळपे, काळूराम वाजे, पै.अशोक सुपे, राजेश कोकाटे सरपंच, नामदेव गोंटे सरपंच, विष्णू गोडे सर, केंद्रप्रमुख कृष्णा भांगरे सर, जगधने सर जालिंदर मेठल पाटील, सुनिल गवारी पाटील, अंकुश ठाकर पाटील, थरकुडे पाटील, फॉरेस्ट कर्मचारी पोपटराव हिले, SRP कर्मचारी सखाराम वाजे साहेब नाथा मोरमारे, अंकुश चिमटे, विक्रम हेमाडे, आदी उपस्थित होते.

यावेळी शरद लोहकरे म्हणाले माझ्या यशात शेतकरी आई- वडील, मोठे बंधू बजरंग गिरजू लोहकरे गुरुजी यांचा मोठा वाटा आहे त्यांचे सर्वच बाबतीत सहकार्य राहिले. बंधूंचा भक्कम आधार, कुटुंबाची साथ व आईवडील यांचे आशिर्वाद हे यशाचे गमक आहे. शरदने आपले मत व्यक्त केले. तसेच पत्नी स्वाती शरद लोहकरे या प्रथम वर्ग न्यायाधीश आहेत. त्यांचीही साथ मोलाची असल्याचे लोहकरे यांनी सत्कारला उत्तर देताना सांगितले.

एक गरीब कुटुंबातील युवक आपली जिद्द व अपार कष्टाच्या जोरावर लोहकरे उपनिरीक्षकपदी विराजमान होऊन मोठा अधिकारी झाला हा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे. असे मत आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संघटन मंत्री नारायण ठाकर यांनी व्यक्त केले. आणि त्यांच्या यशाने आंदर मावळची शान वाढली आहे.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी सभापती शंकरराव सुपे, शिक्षक नेते वि. म. शिंदे, नारायण कांबळे, मा ता शि सं अध्यक्ष गेणूभाऊ मोरमारे, रोहिदास सुपे, अरुण मोरमारे हेमाडे सर, या मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.