Maval News : शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज – मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते महिलांचा गौरव करण्यात आला.

अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षिका, कृषी खाते, सरकारी कार्यालयात काम करणा-या महिला आणि कोरोना काळात चांगले काम केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचाही वडगाव मावळ येथे सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश जाधव, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजु खांडभोर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”शिवसेना कायमच सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि सामाजासाठी काम करणा-यांसोबत राहिली आहे. कोरोना कालावधीमध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी चांगले काम केले आहे. सन्मानाला ख-या अर्थाने पात्र आहेत. राज्य सरकार कोरोना कालावधीत अतिशय चांगले काम करत आहे. सरकारचे प्रतिनिधीम्हणून कर्मचा-यांनी चांगले काम केले आहे. कोरोना पुन्हा वाढत आहे. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोना संपलेला नाही. कोरोना पुन्हा दुसऱ्यांदा झपाट्याने डोकेवर काढत आहे. त्याचा सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला पाहिजे”.

संपर्कप्रमुख बाळा कदम यांचेही मनोगत झाले. तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी प्रास्ताविक केले. तर, अमित कुंभार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.