Maval Shivsena news: जनतेची कामे जलद, वेळेत पूर्ण होण्यासाठी शिवसेनेचे मावळातील वडगांवमध्ये विभागीय कार्यालय

वडगाव येथील भेगडे लॉन समोर हे  कार्यालय सुरु होणार आहे. : Shiv Sena's divisional office at Wadgaon in Mavla for speedy completion of public works

एमपीसी न्यूज  – मावळ क्षेत्रातील जनतेच्या समस्या, तक्रारी, कामे जलदगतीने आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी विविध शासकीय कार्यालये असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगांवमध्ये शिवसेनेचे विभागीय  कार्यालये सुरु केले जाणार आहे. 15 ऑगस्टपासून हे कार्यालय जनतेच्या सेवेत कार्यरत असणार आहे.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजता कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

वडगाव येथील भेगडे लॉन समोर हे  कार्यालय सुरु होणार आहे. शिवसेनेने मावळमधील जनतेच्या समस्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘शिवसारथी- भगवा सारथी’ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा देखील शुभारंभ खासदार बारणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला जिल्हा संघटिका शादान चौधरी, उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, महिला तालुका संघटिका  शैला खंडागळे, युवासेना प्रमुख अनिकेत घुले उपस्थित राहणार आहेत.

कोरोना काळ लक्षातघेता मावळ तालुक्यातील फक्त प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

मावळ तालुका ग्रामीण भागात मोडतो. वाड्या-वस्त्यांवर नागरिक राहत आहेत. मावळातील वडगांव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तहसीलदार, प्रांत, दुय्यम निबंधक, पोलीस अशी महत्वाची शासकीय कार्यालये वडगांवमध्ये आहेत. नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वडगावमध्ये यावे लागते. कामांसाठी सातत्याने फे-या माराव्या लागतात.

मावळ क्षेत्रातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे, कामे जलदगतीने आणि वेळेत मार्गी लावावीत, यासाठी शिवसेनेतर्फे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वडगांवमध्ये विभागीय कार्यालय सुरु करण्यात येणार आहे.  15 ऑगस्टपासून ते कार्यान्वित होणार असल्याचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.