Maval News : सामाजिक उत्तरदायित्वातून आंदर मावळातील विद्यर्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम

एमपीसी न्यूज – Knorr Bremse Global Care Asia Pacific, Knorr-Bremse Technology Center India, KB CVS आणि Work for Equality या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अंदर मावळ विभागातील 11 गावांमधील विविध प्रश्नांवर काम करून गावकऱ्यांच्या विकासामध्ये हातभार लावण्याचे व्रत या सर्व संस्थांनी एकत्रित येऊन घेण्याचे ठरविले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी सह्याद्री विद्यालय – मावळ शिक्षण संस्था मेटलवाडी या शाळेसाठी WASH (water sanitation and hygine program ) हा कार्यक्रम सुरु करून केली गेली. या प्रसंगी Knorr Bremse Global Care Asia Pacific कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पाच्या माध्यमातून 8 टॉयलेट्स युनिट्स आणि 5000 लिटरच्या पाण्याच्या दोन टाक्या तसेच पाण्याची व्यवस्था केली गेली.

शाळेतील मुलांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात व सुविधांअभावी ग्रामीण भागातील मुलांच्या व खास करून मुलींच्या शिक्षणावर किती विपरीत परिणाम होतो व त्याचे पर्यवसान अर्धवट शिक्षण, बालविवाह, बेरोजगारी, हिंसा आणि व्यसन यामध्ये होते. हे दुष्टचक्र थांविण्यासाठी शिक्षण व आरोग्य या दोन विषयावर विशेष लक्ष देण्याचा या संस्थांचा ध्यास आहे.

कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये मुलांमध्ये आरोग्याचा स्तर उंचाविण्यासाठी आरोग्याच्या योग्य सवयी, आरोग्याविषयी शास्त्रीय माहिती आणि लोकांच्या मतांच्या कौल घेऊन पुढील नियोजन करण्याचे ठरले आहे.

कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी Knorr Bremse कंपनीचे अधिकारी नीरज गुप्ता, आशा पवार, श्रीकांत कुलकर्णी तसेच सह्याद्री विद्यालय मेटलवाडी शाळेचे अध्यक्ष शांताराम कदम, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सावळा ग्रामपंचायत सरपंच नामदेव गोंटे, केंद्रप्रमुख बोराडे सर, जिल्हा परिषद मेटलवाडी शाळेचे शेख सर, व तुषार ठाणेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उत्साहात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाने व लेझीम ढोल ताशाने भर टाकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री विद्यालयाचे गारे सर व वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेच्या श्रद्धा तेलंगे यांनी केले.तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री नीरज सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मुलांना दिवाळीचा फराळ वाटून केली गेली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.