Maval News : राजमाची येथे भाजप महिला आघाडीचा विशेष कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने “खेळ रंगला पैठणीचा” व हळदी कुंकु तसेच आदिवासी मुलांना खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन लोणावळा
शहरापासून 19 किलोमीटर दूर दुर्गम भागात असणारे आदिवासी समाजाचे गाव राजमाची याठिकाणी करण्यात आले होते.

शहरी भागात अनेक असे कार्यक्रम होतात परंतु अशा दुर्गम भागात असे कार्यक्रम किंवा उपक्रम होत नसल्याची अशी खंत येथील महिलांना होती म्हणून याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तरुण मुलींपासून अनेक वयोवृद्ध महिलांनीही सहभाग घेतला.

यावेळी राजमाता जिजाऊ महिला मंच मावळ तालुका अध्यक्ष सारीका संजय भेगडे, सभापती निकिता घोटकुले, माजी सभापती सुवर्णा कुंभार, पंचायत समिती सदस्य जनाबाई पोटफोडे, ज्योती शिंदे, डॉ. उज्ज्वला रवींद्र भेगडे,  प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, राजमाचीच्या सरपंच प्रगती वरे, नगरसेवक विशाल पाडाळे, लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, माजी सरपंच कृष्णा घिसरे, वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले, दत्तात्रय कोंढभर, नाणे मावळ महिला आघाडी अध्यक्ष सिमा आहेरसह ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थिती होत्या.

प्रथम क्रमांक – पैठणी, चंदा किरण वरे
द्वितीय क्रमांक – सोन्याची नथ, सुनिता सुभाष वरे.
तृतीय क्रमांक – चांदीची जोडवी, हिराबाई एकनाथ वरे तसेच राजमाची गावातील प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष सायली बोत्रे व भाजपा महिला आघाडी मावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आले. स्वागत कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव तसेच प्रास्ताविक सायली बोत्रे व आभार तालुका सरचिटणीस वैशाली ढोरे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरचिटणीस अनिता सावले, उपाध्यक्ष रोहिणी गाडे, अश्विनी तिकोणे, कल्याणी राक्षे, वैदही रणदिवे, सारिका शिंदे, प्रसिद्धीप्रमुख ज्योती काटकर, सचिव सुजाता मु्र्हे, शैलजा मुर्हे, अंजली कडू जनाबाई पवार, सारिका घोलप यांनी केले. पैठणी खेळाचा खेळ प्रसिद्ध निवेदक अभिजीत कडू यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.