Maval News: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या हालचालींना वेग

एमपीसी न्यूज- तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मागील महिन्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचा भारतमाला प्रकल्पात समावेश करून रस्त्याच्या कामास त्वरित सुरवात करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या महामार्गाच्या कामांना  हालचालींना वेग आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सध्या सुरू असुन या महामार्गाच्या कामास अधिक गती देऊन कसे पूर्णत्वास नेता येईल यासंदर्भात शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपसंचालक अनिल गोरड, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता प्रकाश चव्हाण, प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे व डीपीआर तयार करणारे कन्सल्टंट लायन इंजिनिअरिंगचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा आढावा घेऊन भविष्याचा विचार करता काही महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.