Maval News : प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करा – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज – मावळ आज काले कॉलनी, पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयाला मावळ तालुका भाजप अध्यक्ष रवींद्र (आप्पा) भेगडे यांनी भेट दिली. यावेळी रुग्णालयात कोविड रुग्णांना आवश्यक असणाऱ्या पिण्यासाठी कोमट पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वॉटर फिल्टर भेट देण्यात आले तसेच येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पाणी गरम करण्याचे इलेक्ट्रीक मशीन देण्यात आले.

यावेळी दोन्ही रुग्णालयातील इतर माहिती घेत असताना काले येथील ग्रामीण रुग्णालयात जनरेटर अभावी व्हेंटिलेटर बेड सुरू नाहीत हे लक्षात आल्यावर प्राथमिक स्वरूपात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ते उपलब्ध करू पण, व्हेंटिलेटर उपलब्ध करा, अशी मागणी भेगडे यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

येळसे येथील आरोग्य केंद्रात देखील सुविधांचा अभाव असून या ठिकाणी मंडपची व्यवस्था भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली असल्याचेही भेगडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उद्यापासून त्या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना इतर आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी शासनाने लक्ष घालावे व लसीकरणासाठी आजूबाजूच्या गावातून नागरिकांना PHC वर यावं लागत आहे.यातून संसर्गाचा धोका अधिक असून ही सुविधा आंबेगाव व हवेली प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भेगडे यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे केली आहे.

यावेळी उपस्थित मावळ तालुका संघटन मंत्री किरण राक्षे, जि.प.सदस्या अलका धानिवले, महागाव गण अध्यक्ष नारायण बोडके, गणेश ठाकर, काले गावचे सरपंच खंडू कालेकर, गणेश धानिवले व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.