Maval News : मावळातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांची सहल घडविण्यासाठी ‘एसटी’ची लोणावळा दर्शन बससेवा सुरु

एमपीसी न्यूज – मावळ परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची एक दिवसीय सहल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगारातून ‘लोणावळा दर्शन’ ही बससेवा सुरु करण्यात आली आहे.

स्वारगेट – लोणावळा – स्वारगेट ही ‘लोणावळा दर्शन’ बस प्रत्येक रविवारी सकाळी सात वाजता स्वारगेट बस स्थानकावरून सुटणार आहे.

या बस मधून प्रवाशांना मावळ तालुक्यातील प्रति शिर्डी, भुशी डॅम, राजमाची पॉईंट, नारायणधाम मंदिर, एकविरा देवस्थान- कार्ला या प्रेक्षणीय, धार्मिक आणि निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या ठिकाणी भेट देता येणार आहे.

या बसचे आरक्षण जवळच्या बस स्थानकात तसेच ऑनलाईन माध्यमातून महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php) करता येणार आहे.

‘लोणावळा दर्शन’ फेरीचे आरक्षण करण्यासाठी स्वारगेट – लोणावळा दर्शन SWR – LNVDMP या सांकेतिक कोडचा वापर करावा. या फेरीसाठी प्रतिव्यक्ती 380 रुपये तिकीट असणार आहे.

कुटुंबासोबत मावळ परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी या लोणावळा दर्शन फेरीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वारगेट आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.