-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval News :  मावळातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार 35 टक्के फी सवलत

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 14 हजार विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : पाच टक्के फीचा बोजा उचलण्याची आमदार शेळके यांची घोषणा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज  – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये 30 टक्के सवलत देण्याबाबत तहसीलदारांनी आयोजित केलेल्या बैठकीत सहमती झाली. या व्यतिरिक्त आमदार सुनील शेळके यांनी पाच टक्के फीचा बोजा उचलण्याची घोषणा केल्याने या विद्यार्थ्यांना एकूण 35 टक्के फी सवलत मिळणार आहे. या निर्णयामुळे सुमारे 14 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे,   गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत राक्षे, संस्थाचालकांपैकी चंद्रकांत शेटे, संतोष खांडगे, गणेश भेगडे, प्रकाश ओसवाल, गणेश खांडगे, संदीप काकडे, शैलेश शहा, किशोर राजस, भगवान शेवकर यांच्यासह पालक सदस्य अरुण माने, जमीर नालबंद,निरंजन सावंत, सुबोध जाजू, अतुल चौधरी,अरुण वाघमारे, अर्चना दाभाडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

शासनाच्या आदेशानुसार ट्यूशन फी व्यतिरिक्त अवांतर कोणतेही शुल्क शाळांना आकारता येणार नाही तसेच नवीन फीवाढ करता येणार नाही, असे तहसीलदार बर्गे यांनी प्रारंभीच स्पष्ट केले.

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद असून काही संस्थानी ऑनलाईन शिक्षण चालू ठेवलेले आहे.या पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावलेला असून फी मध्ये सवलत द्यावी. अशी मागणी पालकांकडून होत आहे. तर काही ठिकाणी पालक व संस्थाचालक यांच्या मध्ये संघर्ष निर्माण झालेला होता.

पालकांकडून चालू शैक्षणिक वर्षात फी मध्ये 50 टक्के सवलतीची जोरदार मागणी करण्यात आली होती. संस्था या निर्णयाला तयार नव्हत्या. संस्थाचालकांनी 25 टक्क्यांपेक्षा जास्त सवलत देण्यास असमर्थता व्यक्त केली.

आमदार सुनील शेळके यांनी संस्थाचालकांनी पालकांना तीस टक्के सवलत देण्याची विनंती केली. आमदार शेळके यांनी स्वतः 5% टक्के फीचा बोजा उचलण्याची घोषणा केली. अशा प्रकारे 35 टक्के सवलत पालकांना दिली जाईल, असा सामुदायिक निर्णय करण्यात आला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मावळ तालुक्यात काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा मनमानी फी आकारणी आणि मनमानी वागत आहेत.त्यांच्यावर मावळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अंकुश ठेवावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

कोरोनाच्या कालखंडात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झालेले आहे. त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण संस्थांकडून मोफत केले जाईल.

शैक्षणिक संस्थांनी  सवलती नंतर पालकांना फी चे समान हप्ते करून द्यावेत.

गेल्या वर्षी ही सवलत दिली असताना ज्या पालकांनी अद्याप फी भरली नाही. त्यांनी त्वरित फी भरून घ्यावी.

शैक्षणिक फीवाढी संदर्भात पालकांनी पुकारलेल्या आंदोलनाला प्रशासन, लोकप्रतिनिधी,पालक व पालक प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे तोडगा केला. हा मावळ तालुक्याचा शैक्षणिक दृष्ट्या राज्यातील नमुना (पॅटर्न) ठरेल.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.