Maval News: सांगवडे परिसरात दहशत माजविणाऱ्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश!

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सांगवडे गावात मागील दीड महिन्यापासून मादी बिबट्याची दहशत सुरु होती. त्या मादी बिबट्याला  पकडण्यात अखेर आज (रविवारी) सकाळी सहा वाजता वन विभागाला यश आले. मागील वर्षी सांगावडे व दारुंब्रे गावात प्रत्येकी दोन अशी चार पिल्ले सापडली होते. त्यांना परत  जंगलात सोडण्यात आले होते. रविवारी मादी बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात आले.

वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगावडे हद्दीत मागील दीड महिन्यापासून मादी बिबट्याचा वावर होता. अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी बघितल्याचे वनविभागाला सांगितले.

त्यानुसार शुक्रवारी (दि.7) रोजी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. रविवारी पहाटे दोन वाजता पिंजऱ्याजवळ बिबटया आला होता. सकाळी सहा वाजता पिंजऱ्यात बंद झाला. त्याला राजीव गांधी प्राणिसंग्रहालय  कात्रज पुणे येथे आरोग्य तपासणी करुन ठेवण्यात आले.

या परिसरात आणखी बिबटे असण्याचा अंदाज असून कोणाला दिसल्यास वनविभागाला कळविण्याचे आवाहन केले.

बिबट्याला पकडण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे संस्थापक नीलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, गणेश निसाळ, गणेश ढोरे, प्रथमेश मुंगीकर, निनाद काकडे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, रोहित दाभाडे, जीगर सोलंकी  व इतर काही सर्पमित्र, प्राणीमित्र वनाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.