Maval News : अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी सुनील (नाना) भोंगाडे

एमपीसी न्यूज – माळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील (नाना) दशरथ भोंगाडे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सुनील (नाना) भोंगाडे यांचे सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी अग्रेसर आहेत.

भोंगाडे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, सुदुंबरे ग्रामपंचायतीचे संरपंच बापूसाहेब दरेकर, कशाळचे माजी सरपंच विठ्ठल जाधव, कैलास खांडभोर, नाणे मावळ युवक अध्यक्ष चंद्रकांत परचंड व बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील (नाना) भोंगाडे यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराप्रसंगी भोंगाडे म्हणाले मावळ तालुक्यातील सरपंच सभासदांचे मजबूत संघटन करून सरपंच, उपसरपंच व सदस्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.