Maval News : मावळ तालुक्यात सोमवारी 29 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 2) 29 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 516 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 470 आहे.

शहरी भागात 12 तर ग्रामीण भागात 17 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 7 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 26,026 झाली आहे. तर दिवसभरात 35 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात साळुंब्रे 5, भाजे व कार्ला प्रत्येकी 3, गहुंजे, नायगाव, चिखलसे, करंजगाव, आंबळे व माळवाडी प्रत्येकी 1असे एकूण 29 रुग्ण सापडले. 25,040 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 516 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,203,लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,323 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1301 रुग्ण सापडले आहेत.
शहरी भागात 13,827 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,299 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे.
कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.21 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 106 लोणावळा नगरपरिषद मध्ये 33 वडगाव नगरपंचायतमध्ये 17 व ग्रामीण भागात 314 असे एकूण 470 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.