Maval News : गावागावात होणार छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर

शिवभक्त पै. अनिकेत घुले यांचा संकल्प ; गाव तिथं शिवराय आणि बाबासाहेबांची मूर्ती

एमपीसीन्यूज : गावागावात छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर व्हावा, प्रत्येक गावात शिवराय तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती असावी, भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र करून असंख्य तरुणांचे संघटन व्हावे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून गाव तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसविण्याचा संकल्प मावळ तालुक्यातील शिवभक्त पै. अनिकेत  घुले  यांनी नवीन वर्षानिमित्त केला. त्यांच्या या स्तुत्य व प्रेरणादायी संकल्पाला मावळच्या जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळात आहे.

पै. अनिकेत घुले हे शिवभक्त म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. तसेच ते युवा सेनेचे मावळ तालुका प्रमुख आहेत. गेली अनेक वर्ष आपल्या मित्र परिवारासोबत ते मावळ तालुका व पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावत असतात.

कार्यक्रमानिमित्त केली जाणारी जाहिरातबाजी आणि सत्कार समारंभ यावर काही उत्साही मंडळी लाखोंचा खर्च करताना त्यांना पाहायला मिळाली.

हा सर्व खर्च अनावश्यक असल्याची जाणीव पै. घुले यांना झाली. मग हाच खर्च आयोजकांनी विधायक कार्यासाठी करावा, किंबहुना त्यांना त्यासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

मग विधायक कार्य कोणते करायचे यावर विचारमंथन करुन तरुणांचे प्रेरणास्थान व महाराष्ट्र आणि देशाची
अस्मिता आणि जाज्वल्य अभिमान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या मूर्ती प्रत्येक गावातील प्रमुख मंडळाला किंवा मंदिर तसेच बुद्ध विहाराला भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हाच नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे पै. घुले यांनी आपल्या ‘फेसबूक लाइव्ह’च्या माध्यमातून जाहीर केले. त्याला ‘नेटिझन्स’कडून जोरदार प्रतिसाद मिळाला. अनेकांनी या संकल्पाचे स्वागतही केले.

तसेच विवाह सोहळे असतील किंवा अन्य कार्यक्रम यामधील अनावश्यक खर्च टाळून शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांची मूर्ती दान करण्याचे आवाहनही पै. घुले यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून केले.

या आवाहनाला आता जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. संकल्प केल्यापासून पहिल्या पाच दिवसांत शिवाजी महाराजांच्या दोन मूर्ती भेट स्वरूपात मिळाल्याची माहिती पै. घुले यांनी दिली.

तसेच ज्या तरुणांना आपल्या गावात या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा असेल तसेच या महापुरुषांच्या मूर्तींचे पावित्र्य जपण्याची हमी देणाऱ्या तरुणांना या मूर्ती लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येणार आहेत.

त्यासाठी संबंधित गावात जाहीर कार्यक्रमाचे आयोजनही केले जाईल. इच्छुकांनी प्रसाद रानवडे (7720034191) आणि अक्षय येळवंडे (7768877941) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पै. घुले यांनी केले आहे.

शिवभक्त पै. अनिकेत घुले यांनी गाव तिथं शिवाजी महाराजांची मूर्ती हा संकल्प केला आहे. हा संकल्प तरुणसांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून शिवरायांची पहिली मूर्ती देण्याचा मान आम्ही मिळवला. घुले यांचा संकलप खरोखरच कौत्कुस्पद आहे. राहुल आणि पूजा लालगुडे. ( नव विवाहित दांपत्य, मावळ)

1  जानेवारीला संकल्प केला आणि पाच दिवसांत दोन मूर्त्या दान स्वरूपात मिळाल्या. याचा मनस्वी आनंद आहे. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचा मी कायम ऋणी आहे. असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास माझा संकल्प निश्चितच तडीस जाईल यात शंका नाही. पै. अनिकेत घुले- तालुका प्रमुख युवा सेना, मावळ.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.