Maval News : कुसगाव बुद्रुक गावात पोलीस पाटलाची नेमणूक नाही; ग्रामस्थांची गैरसोय

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक गावात पोलीस पाटलाची नेमणूक न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ही नेमणूक का झाली नाही, असा सवाल करत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

प्रदीप नाईक म्हणाले, “कुसगाव बुद्रुक गावात पोलीस पाटलाची नेमणूक न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. गावात कायदा आणी सुव्यवस्था या विषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. मागील दोन वर्षात शंभर ते दीडशे अर्ज, निवेदने शासनाला दिली. परंतु याबाबतीत शासकीय स्तरावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. या मागे अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असू शकतो.

19 नोव्हेंबर 207 मध्ये जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी परीक्षा झाल्या. त्यासाठी मावळ तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले. या भरती मध्ये एक हजार 769 पदांपैकी 909 पदांवर भरती करण्यात येणार होते. प्रत्यक्ष किती जागा भरल्या, गैरप्रकार झाल्याने पुन्हा नेमणुका झाल्या का, असे प्रश्न निवेदनात विचारण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.