Maval News : मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी ज्योती नितीन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निकिता घोटकुले यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदाची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.7) येथील सभागृहात संपन्न झाली.

त्यात एकमेव सभापती पदाच्या निवडणुकीसाठी ज्योती शिंदे यांचा अर्ज प्राप्त झाला. अर्ज वैध ठरल्याने त्यांची दुपारी दोन वाजता बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीबद्दल त्यांची पंचायत समिती ते श्री पोटोबा महाराज मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढली.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, भाजप तालुका प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजप महिला तालुकाध्यक्ष सायली बोत्रे, मावळत्या सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पंचायत समिती सदस्य गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, सुवर्णा कुंभार, जिजाबाई पोटफोडे, राजश्री राऊत, साहेबराव कारके, महादू उघडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, माजी सभापती एकनाथ टिळे, राजाराम शिंदे, माऊली शिंदे, अविनाश बवरे व बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्योती शिंदे यांच्या सभापती निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजप तालुका प्रभारी भास्कर म्हाळसकर तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

“सत्कारप्रसंगी ज्योती शिंदे म्हणाल्या मावळ पंचायत समितीच्या सभापतीचे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाला असताना, अनुसूचित जातीच्या उमेदवाराला या पदाचा मान हा भाजपामुळेच मिळाला आहे. मावळ पंचायत समितीच्या अंतर्गत असलेली विविध विकास कामे तसेच वैयक्तिक योजना सक्रियपणे राबविणार.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी उपसभापती शांताराम कदम यांनी केले. आभार उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.